breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी, श्री श्री रविशंकर याचेंवर गुन्हा नोंदवा – संभाजी ब्रिगेड

पिंपरी | महाईन्यूज

महाराष्ट्राचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाबाबत समाजामध्ये चुकीचा संदेश देऊन त्यांची मानहानी करणा-या आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी केली आहे.

यासंदर्भात काळे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अखंड भारताचे प्रेरणास्थान व महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून रामदास स्वामी आणि छत्रपती शिवरायांचा दूरदूरपर्यंत कसलाही संबंध नसताना महाराजांना जाणीवपूर्वक कमी लेखूण रामदास स्वामींचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी केलेला आहे. रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य सांभाळून व लढाया करुन थकुण गेले आहेत. रामदास स्वामी स्वराज्याचे राजे आहेत. शिवाजी महाराज रामदासाचे शिष्य आहेत. रामदास स्वामींच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज आपले गुडघे टेकून आपला मुकुट व तलवार रामदासाच्या चरणी अर्पण असलेचा व्हिडिओ श्री श्री रविशंकर यांनी आपल्या अधिकृत यु ट्युब चैनलवरुन प्रसारीत केलेला आहे. अशा आशयाचा लेख प्रकाशित केलेला आहे.

त्यामुळे माझ्या व महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी जनतेच्या धार्मिक श्रध्दांचा अपमान झालेला आहे. त्यामुळे श्री श्री रविशंकर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिनांक २ जानेवारी २०२० रोजी वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना लेखी तक्रार दिली होती. 2० जानेवारी २०२० रोजी पोलिस उपायुक्त परीमडंल २ यांना देखील समक्ष भेटून तक्रार अर्ज केला होता. २७ जानेवारी २०२० रोजी पोलीस आयुक्त यांचेकडे देखील तक्रार दिलेली होती. याशिवाय, रविशंकर यांचेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अनेक आंदोलने देखील केली आहेत. तरी देखील श्री श्री रविशंकर यांचेवर गुन्हा दाखल केला नाही.

श्री श्री रविशंकर यांचेवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना काळे यांनी दिला आहे. या निवेदनावर पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, उपाध्यक्ष सतिश काळे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते यांच्या स्वाक्षरी आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button