breaking-newsराष्ट्रिय

जैश ए महंमदच्या दहशतवाद्याचा खात्मा

पाकिस्तानातील जैश ए महंमदच्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात चकमक झाली होती.

ANI

@ANI

Budgam (J&K) encounter: From the incriminating materials recovered, the killed terrorist has been identified as Zarar from Pakistan, who was affiliated with proscribed terror outfit Jaish-e-Mohammed (JeM). Arms & ammunition recovered. Case registered.

३९ लोक याविषयी बोलत आहेत

याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील क्रलपोरा चेकपोरा भागास वेढा देऊन शोध मोहीम राबवली जात होती. दरम्यान या परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यानंतर जवानांनी केलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. घटनास्थळावरून त्याचा मृतदेह देखील ताब्यात घेण्यात आला असून, त्याची ओळख देखील पटली आहे. झारार असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानी नागरिक असुन त्याचा जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे. याशिवाय चकमक झालेल्या ठिकाणाहून जवानांनी शस्त्र देखील जप्त केली आहेत. ही मोहीम यशस्वी ठरली असुन यामध्ये कोणत्याही जवानात हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button