breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

खासदार संजय राऊत पराभवाचं खापर अपक्षांवर कसं फोडू शकतात?, अजितदादांच्या मर्जीतील आमदाराचा सवाल

मुंबई : “संजय राऊत पराभवाचं खापर अपक्षांवर कसं फोडू शकतात?”, असा खडा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केला आहे. “मी अजितदादांशी चर्चा करुनच मतदान केलं. त्यानुसार पहिल्या पसंतीचं मत मी संजय पवार यांनाच दिलं आहे. त्यांना दुसऱ्या क्रमाकांची मतं कमी मिळाली हे खरंय, पण मी माझं काम केलंय”, असं देवेंद्र भुयार म्हणाले.

काही अपक्ष आमदारांनी आम्हाला शब्द देऊन त्यांनी तो शब्द फिरवला. त्यामुळे आमच्या उमेदवाराचा पराभव झाला, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी संजय पवार यांच्या पराभवाचं खापर अपक्ष आमदारांवर फोडलं. मात्र राऊतांचे केलेले आरोप देवेंद्र भुयार यांनी साफ फेटाळून लावले आहेत.

संजय राऊत पराभवाचं खापर अपक्षांवर कसं फोडू शकतात?

“पहिल्या क्रमांकाची ३३ मतं संजय पवारांना दिलेली आहेत तर महाडिकांना २३ मतं आहे. म्हणजे दहा मतांचा फरक आहे. मग ही १० मतं कुणाची आहेत…? आमचीच तर आहेत ना? दुसऱ्या क्रमाकांची मतं संजय पवारांना जेवढी मिळायला पाहिजे होती, तेवढी मिळाली नाहीत, हे खरंय. मी महाविकास आघाडीसोबत पहिल्या दिवसापासून आहे. सरकार स्थापन होण्याआधीपासून मी अजितदादांसोबत आहे, शिवसेना नंतर सरकार स्थापन होण्यासाठी आली”, अशा शब्दात देवेंद्र भुयारांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं.

संजय राऊतांचा आरोप काय?

महाविकास आघाडीच्या गोटातील अपक्ष आमदारांची मतं फुटल्यामुळे शिवसेनेच्या संजय पवार यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढावली. या दगाबाजी करणाऱ्या आमदरांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला दगा देणाऱ्या आमदारांची नावं जाहीरपणे सांगितले. वसई-विरारच्या हितेंद्र ठाकूर यांची तीन मते आम्हाला मिळाली नाहीत. त्यानंतर करमाळ्याचे संजयमामा शिंदे, नांदेडचे श्यामसुंदर शिंगे आणि देवेंद्र भुयार या आमदारांची मते आम्हाला मिळाली नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

“काही घोड्यांवर जास्त बोली लागली. त्यामुळे बाजारात असलेले घोडे विकले गेले. घोड्यांना हरभरे टाकले की ते कुठेही जातात. पण विकले जाणारे लोकं कुणाचीच नसतात. साधारण ६ अपक्षांनी आम्हाला धोका दिला. ज्या अपक्ष आमदारांनी शब्द देऊनही मत दिलं नाही. त्यांची यादी आमच्याकडे आहे, असा गर्भित इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फुटीर आमदारांना दिला.

संख्याबळ असूनही शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. कोणत्या अपक्ष आमदारांनी मविआला शब्द देऊनही धोका दिला, याचा शोध घेतला जातोय. भाजपला जाऊन मिळालेल्या संबंधित आमदारांकडे राऊतांचा रोख होता. दगाबाजी करणारे आमदार कोण आहेत, त्यांची नावं आम्हाला माहिती आहेत. आता पाहुयात, असा गर्भित इशारा संजय राऊत यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button