breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

जेकोविचला संताप पडला महागात, US ओपनमधून बाहेर

मुंबई – जगातील नंबर १ चा टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचला (Novak Djokovic) रविवारी यूएस ओपन (US Open Tournament) अतिशय वेगळ्यापद्धतीने बाहेर पडावं लागलं. देशातील एवढा मोठा खेळाडू असूनही रागावर नियंत्रण न मिळवणं महागात पडलं.

प्री क्वार्टर फायनलमध्ये जोकोविच पहिल्या सेटमध्ये स्पेनच्या पाब्लो केरेना बुस्ता विरूद्ध ५-६ गुण मागे राहिला. या दरम्यान एक गुण गमावल्याच्या निराशेने जोकोविचने बॉल रॅकेटच्या बाहेर मारून कोर्टाच्या बाहेर फेकला. फेकलेला हा बॉल एका महिला जजच्या खांद्यावर लागला. या चुकीमुळे जोकोविचला यूएस ओपनमधून काढण्यात आलं.

स्टार जोकोविचबद्दल अमेरिकी टेनिस संघाने वक्तव्य जाहिर करून याची माहिती दिली आहे. ग्रँड स्लॅममध्ये हा नियम आहे की, कोणताही खेळाडू कोणत्याही अधिकाऱ्याला इजा करतो तर त्याच्याकडून दंड आकारला जाईल. आणि त्याला त्यामधून काढलं जाऊ शकतं. मॅच रेफरीने जोकोविचला यासाठी दोषी समजलं आहे. या घटनेनंतर जोकिवचने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. आणि एक पोस्ट शेअर केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button