breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

OnePlus Nord ला खरेदीची आज संधी, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली – OnePlus Nord स्मार्टफोन आज पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वनप्लसचा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. हँडसेटमध्ये ९० हर्ट्ज फ्लूड अमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 765 5G प्रोसेसर आणि १२ जीबी पर्यंत रॅम असे खास वैशिष्ट्ये या फोनमध्ये देण्यात आले आहेत. हँडसेटची किंमत २७ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते.

OnePlus Nord: ची किंमत
वनप्लस नॉर्ड स्मार्टफोनला आज अॅमेझॉन इंडिया आणि वनप्लस स्टोरवरून फ्लॅश सेलमध्ये खरेदी करता येवू शकते. वनप्लसचा हा सेल आज दुपारी २ वाजता सुरू होणार आहे. वनप्लस नॉर्डच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. तर १२ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. कंपनीने अद्याप ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचे व्हेरियंटला विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले नाही. हा स्मार्टफोन ब्लॅक, आणि ब्लू कलरमध्ये येतो.

OnePlus Nord: चे वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज़ आणि आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. स्क्रीन प्रोटेक्शन साठी कॉर्निंग गोरिला ग्लास ५ चे प्रोटेक्शन दिले आहे. वनप्लस नॉर्ड़ मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765G चिपसेट दिली आहे. हँडसेट अँड्रॉयड १० बेस्ड ऑक्सिजन ओएस १०.५ वर काम करतो.

फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. वनप्लसचा हा फोन ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर दिला आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी यात 4115mAh बॅटरी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button