breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जीव चौक मेट्रो स्टेशनवर पुन्हा ‘देश के गद्दारों को…गोली मारो…’ची घोषणाबाजी, 6 जण ताब्यात

नवी दिल्ली | राजीव चौक मेट्रो स्टेशनवर आज (शनिवार) सकाळी ‘देश के गद्दारों को गोली मारो… ‘ची घोषणाबाजी ऐकू आली. स्टेशनवर नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दळ होती. यादरम्यान पांढरा शर्ट आणि डोक्यावर गमछा लावलेल्या काही तरुणांनी अचानकपणे ‘देश के गद्दारों को, गोली मारो…’ ची घोषणा देण्यास सुरुवात केली.

भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी दिल्ली निवडणुकीतील एका प्रचारसभेत ही घोषणाबाजी केली होती. या दरम्यान स्टेशनवर एकच गोंधळ उडाला होता. घटनास्थळी उपस्थित सुरक्षा रक्षकांनी 6 युवकांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सध्या सगळ्यांची चौकशी सुरू आहे.

मेट्रो स्टेशनवर करण्यात आलेल्या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान सदरील घटना सकाळी 10.52 वाजता घडली असल्याचे दिल्ली मेट्रो कॉरपोरेशन लिमिटेडने (डीएमआरसी) सांगितले. तसेच स्टेशनवर कोणत्याही प्रकारचे प्रदर्शन करण्यास मनाई असल्याचे ते म्हणाले.

वृत्तसंस्थेनुसार, या मुलांनी मेट्रो स्टेशनवर एक ट्रेन थांबतेवेळी ही घोषणाबाजी केली. दरम्यान युवकांनी सीएए समर्थनार्थ घोषणा दिल्याचे सांगितले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button