breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

युवा पिढीने मायबोली मराठीचे संवर्धन करावे :साहित्यिका सुवर्णा पवार

सांगली | महाईन्यूज

जागतिकीकरण व स्पर्धेच्या युगात युवा वर्ग आपल्या मायबोली मराठी साहित्यापासून काहीसा दुरावलेला दिसून येत आहे. साहित्य वाचन मागे पडले आहे. त्यामुळे लिखाणही मागे पडले आहे. वाचन, विचार, चिंतन साहित्यातून येते. आपल्या मायबोलीचे संवर्धन करण्यासाठी युवा पिढीने वाचन, लेखन करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि साहित्यिका सुवर्णा पवार यांनी केले आहे.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय सांगली येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त एस. के. माळी, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्यासह शासकीय कार्यालयाचे कर्मचारी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते. श्रीमती सुर्वणा पवार म्हणाल्या, लेखण करण्यासाठी वाचनाची सवय लागली पाहिजे. वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे मायबोलीचे संवर्धन करण्यासाठी वाचन, लेखण अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक मुल्यांची जपणूक करायची असेल तर वाचन, लेखण केले पाहिजे. प्रत्येकामध्ये एक सुप्त साहित्यिक असतो. तो व्यक्त झाला पाहिजे. जर माणूस व्यक्त होत गेला तर वाचकही वाढतील, असेही त्या म्हणाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button