breaking-newsपिंपरी / चिंचवड

Lockdown : जगाचा पोशिंदा शेतकरी वर्गासाठी राबतायत एच. ए. कंपनीतील अनेक हात

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

‘स्ट्रेप्टोसायक्लीन’ हे शेतीसाठी उपयुक्त असणारे व शेतकऱ्यांच्या पसंतीचे प्रभावी व आंतरप्रवाही असे जीवाणुनाशक प्रतिजैविक असून विविध पिकांसाठी या उत्पादनाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, कोरोनासंसर्गातही पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक कंपनीतून शेतीसाठी लागणाऱ्या औषधांचा पुरवठा अखंड सुरू आहे.

त्यासाठी अनेक हात राबत आहेत. द्राक्षे, डाळिंब मिरची, टोमॅटो, काकडी, कांदा, वांगी, कापूस, भात, बटाटे, लिंबूवर्गीय फळे सोयाबीन केळी, आंबा, सफरचंद, नारळ, सुपारी व मका यासाठी हे औषध वापरले जात आहे. पानांवरील डाग, करपा, पातीवरील मर घालून फवारणी करण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच, बियाणावर प्रक्रिया व रोपे बुडून ठेवण्यासाठी हे कीटकनाशक उपयुक्त आहे.

‘स्ट्रेप्टोसायक्लीन’ प्रतिजैविक हे अनेक पिकांच्या जीवणूजन्य रोगांच्या बंदोबस्तासाठी आहे. रोगप्रतिकारक रोगप्रतिबंधक दोन्हीसाठी महत्वाचे आहे. त्याव्यतिरिक्त गेल्या दोन महिन्यांपासून औषध निर्माण कृषी उत्पादन, वितरण हे विभाग देखील आपकी भूमिका बजावत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button