breaking-newsराष्ट्रिय

जम्मू काश्‍मीरमध्ये अनंतनाग आणि कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरमधील अनंतनाग आणि कुलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांची गोळीबार केला. यातील पहिल्या घटनेमध्ये दहशतवाद्यांनी दक्षिण काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या बामझू भागातल्या मटन येथे सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. या हल्ल्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

दुसऱ्या घटनेमध्ये कुलगाम जिल्ह्यातल्या हवूरा आणि रेडवानी या गावांदरम्यान गस्त घालणाऱ्या गस्तपथकावर दहशतवद्यांनी हल्ला केला. या गोळीबाराला त्यरित प्रत्युत्तर दिले गेले. या घटनेमध्येही कोणतीही जिवीत हानी झाली नाही, असे अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button