breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापुरात कोरोनाचे नऊ रूग्ण वाढले, एकूण संख्या 111 वर
सोलापुरात करोनाबाधित नऊ रूग्ण वाढले. आतापर्यंत रूग्णसंख्या १११ झाली आहे. यात सहा मृतांचा समावेश आहे. तर, यशस्वी उपचारातून करोनावर मात केलेल्या दहा रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात ९५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. सोलापुरात पहिला रूग्ण १२ एप्रिल रोजी आढळून आला होता. १९ दिवसांत रूग्णांची एकूण संख्या १११ पर्यंत पोहोचली आहे. यात ‘सारी’चा प्रादुर्भावही सुरू आहे.