breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जम्मू आणि काश्मीरमध्ये 15 ऑगस्टनंतर 4G इंटरनेट सेवा सुरू होण्याची शक्यता

जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात एक-एक जिल्ह्यात फोर जी इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी अगोदर ट्रायल घेण्यात येणार आहे. त्यामुळे, १५ ऑगस्टनंतर या भागात फोर जी इंटरनेट सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.सर्वोच्च न्यायालयात जम्मू काश्मीरमध्ये फोर जी इंटरनेट सेवा देण्याच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी दरम्यान केंद्र सरकारनं हे स्पष्टीकरण दिलंय. जम्मू काश्मीरच्या प्रत्येकी एका जिल्ह्यात हाय स्पीड इंटरनेट सुविधा अगोदर ट्रायल म्हणून सुरू करण्याची तयारी पूर्ण झालीय. ही सुविधा जम्मू काश्मीर खोऱ्यात १५ ऑगस्टनंतर सुरू केली जाईल. त्यानंतर दोन महिन्यांनी याची समिक्षा केली जाणार आहे.

ज्या क्षेत्रात फोर जी सेवा देता येणं शक्य आहे, अशा जिल्ह्याची अगोदर निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर फोर जी सुविधा पुरविली जाईल, असं केंद्राची बाजू मांडणाऱ्या अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी कोर्टासमोर म्हटलंय. समितीच्या म्हणण्यानुसार सध्या शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांसाठी लँडलाईन माध्यमातून ब्रॉडबॅन्ड सुविधा उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलंय. विशेष समितीच्या सल्ल्यानुसार, कमी हिंसा क्षेत्रांची ओळख पटवून उच्च गतीचं इंटरनेट ट्रायल म्हणून सुरू केलं जाऊ शकतं.

केंद्रानं घेतलेल्या भूमिकेचं न्यायालयानं कौतुक केलंय. पंरतु, या प्रकरणाचे आदेश सार्वजनिक क्षेत्रात असायला हवेत, असंदेखील न्यायमूर्ती एन व्ही रमना यांनी म्हटलंय.१६ ऑगस्टपासून जम्मू आणि काश्मीर विभागातील प्रत्येक जिल्ह्यात सूट दिली जाईल. दोन महिन्यांनंतर त्याची समिक्षा केली जाईल, असं केंद्रानं म्हटलंय.

या मुद्द्यावर विशष समितीनं १० ऑगस्ट रोजी तिसरी बैठक घेतली होती. स्थानिक एजन्सीशी सल्लामसलत करून आणि सुरक्षेला ध्यानात ठेवून वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करण्यात आला. इंटरनेट बंदीमुळे कोविडविरुद्धची लढाई, शिक्षण किंवा व्यवसायात कोणताही अडथळा होत नसल्याचंही समितीचं म्हणणं आहे. सद्य परिस्थिती मोबाईल फोनसाठी हाय स्पीड इंटरनेट सेवा देण्यासाठी अनुकूल नाही. जम्मू काश्मीरमध्ये अजूनही धोका अधिक असल्याचं समितीचं म्हणणं आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button