breaking-newsपुणे

चक्क डॉक्टरने केली रुग्ण महिलेकडे शरीरसुखाची मागणी, शिरूर तालुक्यातील घटना

पुणे- तपासणीस आलेल्या रुग्ण महिलेकडे चक्क डॉक्टरकडूनच शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार शिरूर तालुक्यातील न्हावरा येथे घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन डॉक्टर रामहरी लाड याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापुर येथील पीडित महिला आजारी असल्याने या महिलेला न्हावरा येथील नाथकृपा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

हॉस्पिटलमध्ये महिलेवर उपचार सुरू असताना रविवारी रात्रीच्या वेळेस डॉ. रामहरी लाड यांनी सदर पीडितेला तपासणी करायची आहे असे बोलून त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले. त्यानुसार पीडित महिला डॉक्टरांच्या केबिन मध्ये आली असता डॉक्टरांनी महिलेला गुप्तांगातून तपासणी करायची असल्याचे सांगितले. यावेळी पीडितेने माझ्या पालकांना सांगा त्यानंतर पाहू असे म्हटले असता डॉ. लाड यांनी तू कोणालाही काही बोलू नकोस थांब असे म्हणून तिच्याकडे शरीरसुखाची इच्छा व्यक्त करत महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

यावेळी महिलेने डॉक्टरांना ढकलून देत घाबरून डॉक्टरांच्या केबिन बाहेर धाव घेतली आणि आपल्या घरच्यांना फोन करून घडलेली सर्व माहिती सांगितली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत घटनेबाबत पोलीसांना माहिती देत याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. पीडित महिलेने शिरूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी न्हावरा येथील नाथकृपा हॉस्पिटल चे संचालक डॉ. रामहरी भुजंगराव लाड रा. न्हावरा ता. शिरूर जि. पुणे यांच्याविरुद्ध विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोटे हे करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button