breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

जपाननं नव्या सम्राटाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं रद्द

कोरोनाची दहशत जगभरात पसरली आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये हजारो लोकांचे जीव गेले आहेत तर ६० हजारांहून अधिक लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे. कोरोनाच्या भीतीनं जपाननं नव्या सम्राटाच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशनही रद्द केले.

जपानचे नवे सम्राट नारूहितो यांचा २३ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं राजमहालात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. देशातले लाखो लोक नारूहितो यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमतात, जनतेची सम्राट भेट घेतात, मात्र कोरोनाच्या चिंतेमुळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

राजमहालातून तसं अधिकृत परिपत्रक जाहीर करण्यात आलं. याद्वारे राजमहाबाहेर न जमण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राजगादीवर आल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा वाढदिवस साजरा होणार होता मात्र आता तो रद्द करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button