breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जगातील सर्वांत मोठ्या लसीकरणाला सुरुवात, मोदींकडून मोहिमेला प्रारंभ

नवी दिल्ली – अखेर १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कोरोनावर प्रतिबंध करणाऱ्या लसीला परवानगी मिळाली असून आजपासून लसीकरणाला सुरुवातही झाली आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी दोन लसींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. त्यापैकी ‘ऑक्सफर्ड’ने विकसित केलेली आणि ‘सीरम’ संस्थेने उत्पादित केलेल्या ‘कोव्हिशील्ड’ लशीने तिन्ही मानवी चाचण्या पूर्ण केल्या आहेत, परंतु भारत बायोटेकने विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. या संवादादरम्यान मोदी भावूक झाले होते. गेल्या १० महिन्यांपासून ज्या फ्रंट लाईन वर्कर्स रुग्णांची सेवा केली त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यांनी अभियानाला सुरुवात केल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

– ज्याला कोरोना लशीची जास्त गरज त्याला प्राधान्याने कोरोना लस मिळणार आहे. आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस यांच्या लसीकरणाचा खर्च भारत सरकार उचलणार आहे.

– तुम्हाला पहिलं लसीकरण झाल्यानंतर दुसरा डोस कधी मिळणार याची माहिती तुमच्या फोनवर दिली जाणार आहे.

-देशातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोरोना लस देण्यात येणार आहे. या कोरोना योद्धयांना देण्यात येणाऱ्या लशीचा खर्च हा केंद्र सरकार उचलणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

– कोरोना लसीचा दुसरा डोस घेणं गरजेचे आहे. पहिला आणि दुसरा डोस यामध्ये 1 महिन्याचं अंतर ठेवले जाईल. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनंतर कोरोना विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होईल. त्यामुळे निष्काळजीपणा दाखवू नका.

– इतिहासातील सर्वात मोठ लसीकरण अभियान आहे. जगातील सर्वात मोठ लसीकरण अभियान आहे. जगात 100 देशांची संख्या 3 कोटींपेक्षा कमी, भारत 3 कोटी लोकांना लसीकरण करणार, दुसऱ्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लसीकरण करणार आहे.

– लस घेतली म्हणजे आपण सुरक्षित आहोत, असं समजू नका. हलगर्जीपणा करु नका. मास्क घाला आणि आवश्यक शारिरक अंतर पाळा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.

– वैज्ञानिक आणि तज्ज्ञ दोन्ही कोरोना लसीच्या गुणवत्तेबद्दल आश्वस्त झाल्यानंतर कोरोनालसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली. कोरोना लसीबाबतच्या अप्रचाराला बळी पडू नका.

-जगातील 60 टक्के लहान मुलांना जीवनरक्षक लसी दिल्या जातात त्या भारतात बनतात. जगाचा मेड इन इंडिया कोरोना वॅक्सिननमध्ये विश्वास वाढणार आहे. जगातील सर्वात कमी किमंत असणाऱ्या भारताच्या लसी आहेत.

– मास्क, पीपीई किट या वस्तू आयात कराव्या लागल्या, मात्र भारत सध्या त्या गोष्टींमध्ये आत्मनिर्भर झाला आहे.

-कोरोनाचा सामना करण्यासाठी आत्मविश्वासाची गरज आहे. जेव्हा कोरोना भारतात पसरला तेव्हा भारतात एकच कोरोना तपासणी चाचणी केंद्र होतं. मात्र तेव्हा आपण सर्वांनी आपल्या डॉक्टरांवर विश्वास दाखवला. आजमितीस भारतात काही हजारोंच्या संख्येत कोरोना लॅब आहे. हे फक्त विश्वासामुळेच शक्य असल्याचं मोदींनी नमूद केलं.

– भारत लसीकरण मोहिम सुरु असताना कोरोना संकटाच्या काळातील दिवस आठवतात. या विषाणूनं आजारी व्यक्तीला कुटुंबापासून वेगळं केलं.

-आपल्याला वाचवण्यासाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, स्टाफ, नर्स, आशा वर्कर, पोलीस, सफाई कर्मचारी यांनी मानवतेबद्दल असणाऱ्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. ते कुटुंबापासून दूर राहिले. अनेक दिवस ते घरी गेले नाहीत. काही कोरोना योद्धे माघारी घरी परतले नाहीत.

-कोरोना लसीचा डोस पहिल्यांदा आरोग्य सेवकांना देऊन त्यांचे ऋण व्यक्त करण्याचा प्रयत्न, कोरोना सारख्या आव्हानाची कुणीचं कल्पना केली नव्हती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button