breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

पूरग्रस्तांना मदत: महापालिका आयुक्त राजेश पाटील अन् टीमचे आमदार महेश लांडगेंकडून कौतूक

  • सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी आयुक्त- पदाधिकाऱ्यांचाही ‘एक हात मदतीचा’
  • पूरग्रस्त भागात जनजीवन पूर्वपदावर आणण्यात महापालिका प्रशासानाचे योगदान

पिंपरी । प्रतिनिधी
सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तभागात मदत करुन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका पथकाने मोलाचे योगदान दिले आहे. याबाबत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त राजेश पाटील आणि टीमचे अभिनंदन केले आहे. तसेच, समाजपयोगी कार्याला सदिच्छाही दिल्या आहेत.

याबाबत आमदार लांडगे यांनी आयुक्त पाटील यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्त परिस्थितीमध्ये महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केलेल्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पथकाने सांगली व मिरज आणि कोल्हापूर भागात गाळ, कचरा, चिखल साफ करून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी समर्थपणे जबबादारी पार पाडली. आपत्तीग्रस्तांप्रति आपण संवेदनशील भूमिका घेत आदर्श निर्माण केला आहे.

आपल्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्या पथकाने आवश्यक मनुष्यबळ आणि साधन सामुग्रीसह दि. २७ जुलै २०२१ पासून २ ऑगस्ट २०२१ पर्यंत स्वच्छतेचे काम अतिशय प्रभावीपणे केले आहे. सांगली आणि मिरजसह कुपवाट परिसरातील जनजीवन पूर्ववत करण्यात पिंपरी-चिंचवड महापालिका पथकाने मोलाचे योगदान दिले आहे. यासोबतच कोल्हापूरात आपण मदत दिली आहे.

  • सांगली, कोल्हापूरकरांनी व्यक्त केले समाधान…

पूरग्रस्त परिस्थितीतून सावरण्यासाठी विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका पथकाने केलेल्या कामाबाबत सांगली मिरज कुपवाड महापालिका आयुक्तांनी आभार व्यक्त केले आहे. सांगली आणि कोल्हापूरकरांनीही समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांच्यासह आयुक्त राजेश पाटील आणि टिमचे कार्य दखलपात्र आणि आदर्शवत आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button