ताज्या घडामोडी

छळ झाला…पण मी ठाम राहिलो…पक्ष वाढवला; रावेर मतदारसंघाबाबत एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीसाठी भआजपने राज्यातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेसाठी एकनाथ खडसे किंवा त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, प्रकृतीचे कारण देत खडसे यांनी निवडणूक लढता येणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच मुलगीही लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या मतदारसंघात तुतारीच वाजणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपने माझी सून रक्षा खडसे हिला उमेदवारी दिली असली तरी रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारीच वाजणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुतारीचा कशी विजय होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात भाजपला कुत्र विचारात नव्हतं त्या काळात मी एकटा लढलो. संघर्ष केला आणि भाजप वाढवली, असा टोलाही एकनाथ खडसे यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.

पक्षासाठी मी संघर्ष करताना कधी खचलेलो नाही. कधी पळालो नाही. कधी विकलो नाही. सत्तेसाठी या ठिकाणाहून त्या ठिकाणी गेलो नाही. लाचार होवून कधी पाया पडलो नाही, असेही खडसे म्हणाले. छळ झाला…मात्र मी ठाम राहिलो. माझा पक्ष आणि मी आहे तुम्हाला काय करायचे ते करा, जिल्ह्यात पक्ष वाढवण्याची अशी आपली भूमिका राहिली. मी माझ्या मर्जीचा मालक आहे. मला कोणी सांगण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आता रावेर मतदारसंघात तुतारीच्या विजायासाठी प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले

​  

​लोकसभा निवडणुकीसाठी भआजपने राज्यातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेसाठी एकनाथ खडसे किंवा त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, प्रकृतीचे कारण देत खडसे यांनी 

लोकसभा निवडणुकीसाठी भआजपने राज्यातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेसाठी एकनाथ खडसे किंवा त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, प्रकृतीचे कारण देत खडसे यांनी निवडणूक लढता येणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच मुलगीही लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या मतदारसंघात तुतारीच वाजणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपने माझी सून रक्षा खडसे हिला उमेदवारी दिली असली तरी रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारीच वाजणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुतारीचा कशी विजय होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात भाजपला कुत्र विचारात नव्हतं त्या काळात मी एकटा लढलो. संघर्ष केला आणि भाजप वाढवली, असा टोलाही एकनाथ खडसे यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.

पक्षासाठी मी संघर्ष करताना कधी खचलेलो नाही. कधी पळालो नाही. कधी विकलो नाही. सत्तेसाठी या ठिकाणाहून त्या ठिकाणी गेलो नाही. लाचार होवून कधी पाया पडलो नाही, असेही खडसे म्हणाले. छळ झाला…मात्र मी ठाम राहिलो. माझा पक्ष आणि मी आहे तुम्हाला काय करायचे ते करा, जिल्ह्यात पक्ष वाढवण्याची अशी आपली भूमिका राहिली. मी माझ्या मर्जीचा मालक आहे. मला कोणी सांगण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आता रावेर मतदारसंघात तुतारीच्या विजायासाठी प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button