breaking-newsTOP Newsआरोग्य

जिममध्ये वर्कआऊट झाल्यावर लगेच पाणी पित असाल तर थांबा

Health | आजकाल फिट राहण्यासाठी बहुतेक लोक जिममध्ये तासनतास घाम गाळताना दिसतात. मग वजन कमी करायचं असेल किंवा वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर आजचे तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात जिममध्ये जाताना दिसतात. तर जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर आपल्याला खूप घाम येतो. त्यामुळे आपल्या शरीरात डीहायड्रेशनची समस्या निर्माण होते. तसेच आपला घसा कोरडा होऊन आपल्या जास्त तहान लागते. त्यामुळे वर्कआउट केल्यानंतर बहुतेक लोक लगेच थंड पाणी पितात. पण जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे योग्य आहे का? असा प्रश्न बहुतेक लोकांना पडतो.

जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर आपल्याला तहान लागते त्यामुळे आपण लगेच पाणी पितो. पण कधीही जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका. तसेच जर तुम्ही वर्कआउट करत असाल तर तेव्हा तुम्हाला तहान लागली तर तुम्ही एक ते दोन घोट पाणी पिऊ शकता. पण वर्कआउट केल्यानंतर तुमचे शरीर गरम होते त्यामुळे वीस ते पंचवीस मिनिटानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता.

बहुतेक लोकांना वर्कआउट करताना पाणी पिण्याची सवय असते. पण त्यांची ही सवय त्यांच्यासाठी घातक ठरू शकते. कारण वर्कआउट करताना आपले शरीर गरम असते आणि अशावेळी पाणी पिलं तर याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतं. त्यामुळे वर्कआउट करताना कधीही पाणी पिऊ नका.

सगळ्यात आधी पाणी पिण्याचे दोन नियम प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. मग यातला पहिला नियम म्हणजे कधीही उभे राहून पाणी पिऊ नये. तसेच दुसरा नियम म्हणजे पाणी पिताना नेहमी हळूहळू पाणी पिले पाहिजे.

जेव्हाही तुम्ही वर्कआउट करताना जास्त प्रमाणात घाम गाळता त्यावेळी साध्या पाण्याऐवजी तुम्ही नारळ पाणी प्या किंवा पाण्यामध्ये साखर, मीठ टाकून ते पाणी पिऊ शकता. यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

तुम्ही जेव्हा वर्कआउट करता तेव्हा वर्कआउट झाल्यानंतर थोडा आराम करा त्यानंतर पाणी प्या. जेव्हा तुमच्या शरीरातील घाम निघून जाईल आणि तुमच्या शरीरातून उष्णता यायचं बंद होईल तेव्हा पाणी प्या.

वर्कआउट केल्यानंतर कधीही थंड पाणी पिऊ नका. कारण वर्कआउट केल्यानंतर शरीर गरम होते अशावेळी थंड पाणी पिणे घातक ठरू शकते. त्यामुळे वर्कआउट नंतर कोमट पाणी प्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button