breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऊसतोड कामगारांच्या गाडीला भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

महाईन्यूज | धुळे

मध्यप्रदेशातील ऊस तोडणी कामगारांच्या वाहनाला धुळ्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 कामगारांचा मृत्यू झाला. तर 24 जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातातील जखमींवर धुळे जिल्ह्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व कामगार उस्मानाबाद येथे ऊस तोडणीसाठी जात होते.

मध्यप्रदेशातील ढवळ्या विहीर ठिकाणाहून हे मजुरांचे वाहन ऊस तोडणीसाठी उस्मानाबादकडे जाते होते. काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास या मजुरांच्या वाहनाला धुळे जिल्ह्यातील शिरुर गावाजवळील विंचूर फाट्यावर बोरी नदीच्या पुलावर अपघात झाला. या अपघातात पिकअप गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. यात जवळपास आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत जवळपास 24 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली (Dhule accident sugar cane labor) आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button