breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर घराघरांत व्‍हावा; योगेश गवळी यांचे मत

  • भोसरीत विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी
पिंपरी। जगभरात ज्यांच्या कुशल राज्य कारभाराची ओळख आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर घराघरांत व्‍हावा, असे मत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष योगेश गवळी यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने शिवजयंती निमित्त भोसरी येथील पीएमटी चौकात मंगळवारी (दि.१९) विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पार्पण सोहळा झाला. तसेच, परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीरही घेण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरी-चिचंवड कार्याध्यक्ष योगेश पंडित गवळी यांनी केले होते.
यावेळी कार्यक्रमाला माजी नगरसेवक पंडित आबा गवळी, जालिंदर शिंदे, नगरसेविका प्रियंका बारसे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर, तसेच निवृत्ती शिंदे, भरत लांडगे, गोपी धावडे,  ह.भ.प. राजाराम महाराज फुगे,  ह.भ.प. हरिभाऊ लोंढे,  बाळु धावडे, सुदाराम माने, संतोष फुगे, अंकुश लोंढे, संतोष लांडगे, उमेश लोंढे, अमर फुगे, सचिन कंद, गणेश कंद, अतुल फुगे, स्वप्नील फुगे, निवृत्ती भोसले, विशाल काळभोर आदी उपस्थित होते.
आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ८५ नागरिकांनी रक्तदान केले. सुमारे ३०० नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. सामन्य तपासणीचा ५०० हुन अधिक नागरिकांनी लाभ घेतला. तसेच ३५० नागरिकांनी दातांची तपासणी केली. याबरोबरच मेमोग्राफी व सर्व्हिकल कॅन्सर स्कॅनिंगद्वारे २५० हून अधिक महिलांनी तपासणी करून घेतली. यावेळी शिबिराला सुमारे २ हजार नागरिकांनी भेट दिली. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button