breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये काय सुरू झाले आणि काय बंद राहणार..!

पिंपरी | प्रतिनिधी

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रासाठीचा सुधारित आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी रात्री जारी केला. त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून झाली असून, तो ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे.

राज्य सरकारपाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर आयुक्त हर्डीकर यांनी अनलॉकची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार कोणत्या गोष्टींना परवानगी राहील. कोणत्या बाबींना प्रतिबंध राहील, याबाबत स्पष्ट केले आहे. वैद्यकिय व अत्यावश्यक सेवा, तसेच अत्यावश्यक वस्तू पुरवठ्याची साखळी कायम ठेवण्यासाठी आवश्यक वाहतूक वगळता प्रतिबंधित क्षेत्रामधून नागरिकांना ये-जा करणेसाठी प्रतिबंध असेल, असे आदेशात नमूद केले आहे.

सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांचे कार्यरत कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू अॅप आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्मार्ट सारथी अॅप डाऊनलोड केल्याची खात्री करून घ्यावी. आरोग्य सेतू अॅपच्या माध्यमातून रोगाची संभाव्य लागण विषयी सूचना प्राप्त होत असल्यामुळे व्यक्तीस स्वसंरक्षणासाठी त्याचा उपयोग होतो. स्मार्ट सारथी अॅपमध्ये कोविड-१९ बाबत विविध मार्गदर्शक सूचना, आपल्या आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या औषधांची दुकाने, महापालिकेचे कोविड-१९ फ्लू क्लिनिक या सोयीसुविधांची माहिती प्राप्त होते, असे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button