breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषाने दुमदुमली ‘शिवनेरी’

पुणे – ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषाने किल्ले शिवनेरी आज (मंगळवार) दुमदुमून गेला होता. शिवप्रेमींनी भगवे फेटे, शर्ट घालून हातात भगवे झेंडे घेऊन आलेल्या शिवरायांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी गड भगवामय झाला होता.

शिवनेरीवर शिवजन्मस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री गिरीष बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार शरद सोनवणे, विनायक मेटे आदी मान्यवरांचे उपस्थितीत शिवजन्म सोहळा झाला. पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिलांनी पाळणा म्हटला नंतर सुंठवड्याचे वाटप करण्यात आले. पोलीस पथकाने पारंपरिक वाद्यवृदांत राष्ट्रगीत गायन केले. छत्रपती शिवरायांना बंदुकीच्या फैरीची सलामी देण्यात आली.

दरम्यान, सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा करण्यात आली. किल्ल्यावरील विविध वास्तुंना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. हातात भगवा झेंडा घेऊन ‘जय जिजाऊ जय शिवराय’,’जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत शिवभक्त दिवसभर गडावर येत होते. शिवजन्मस्थानी आदिवासींच्या पारंपरिक गोफ लेझीमच्या खेळाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button