breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus: कोरोनाची हानी रोखण्यासाठी युरोपात हालचाली; आज होणार महत्त्वाची बैठक

फ्रँकफूर्ट | महाईन्यूज

कोरोना विषाणूच्या साथीमुळे येऊ घातलेल्या मंदीचा दीर्घकालीन परिणाम रोखण्यासाठी युरोपीय देशांकडून व्यूहरचना आखण्यात येत आहे. कर सवलती आणि कंपन्यांना वित्तीय पाठबळ देण्यासारख्या उपायांवर विचार केला जात आहे. याशिवाय युरोपीय केंद्रीय बँकेकडूनही काही विशेष उपाय योजले जाणार आहेत.

सूत्रांनी सांगितले की, युरोपीय सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांची या संदर्भात एक बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपन्यांना मौद्रिक प्रोत्साहन योजना जाहीर केल्या जाऊ शकतात. व्याजदरात कपात आणि कॉर्पोरेट बाँड्सची खरेदी, असे निर्णय जाहीर केले जाऊ शकतात. आरोग्यसेवा, व्यवसाय आणि श्रमबाजार यांना पाठबळ देण्यासाठी २८ अब्ज डॉलरचा गुंतवणूक निधी उभारण्याची योजना ‘युरोपीय आयोगा’ने मंगळवारीच जाहीर केली आहे. ‘युरोपी आयोगा’च्या अध्यक्ष उर्सुला व्होन डेर लियेन यांनी सांगितले की, हा निधी युरोपीय संघाच्या सध्याच्या अर्थसंकल्पामधून घेतला जाईल. हा निधी युरोपीय संघाच्या वार्षिक २०.७ लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेच्या अवघा ०.१ टक्का आहे. अशा उपाययोजनांनी कोरोनामुळे होणारे नुकसान मर्यादित राहील. मौद्रिक प्रोत्साहन योजना आणि सरकारी खर्चातील वाढीमुळे वस्तूंची मागणी वाढेल. दरम्यान, १९ देशांच्या युरोपीय संघाकडे मोठे केंद्रीय कोषागार नाही. ही युरोपीय संघाची मोठी समस्या आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button