breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टच्या अध्यक्षपदी रास बिहारी, तर मोहंती सरचिटणीसपदी बिनविरोध

एनयुजे महाराष्ट्रच्या वतीने अभिनंदन

नवी दिल्ली|महाईन्यूज | प्रतिनिधी

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् (इंडिया) निवडणुकीत ज्येष्ठ पत्रकार रास बिहारी (दिल्ली) यांची अध्यक्ष तर प्रसन्ना मोहंती (ओडिसा) सरचिटणीस म्हणून निवडले गेले आहेत. इंटर नँशनल फेडरेशन आँफ जर्नालिस्टस् (ब्रुसेल्स) शी संलग्न NUJI च्या द्वेवार्षिक निवडणुकीत सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडले गेले आहेत.
एनयुजे निवडणूक अधिकारी रजत कुमार गुप्ता यांनी सांगितले की, वाराणसीचे वरिष्ठ पत्रकार डॉ. अरविंद सिंह यांना कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून
भोपाळचे प्रदीप तिवारी
जम्मू-काश्मीरचे सय्यद जुनैद, गुवाहाटीचे भूपेन गोस्वामी, हरिद्वारचे रामचंद्र कन्नोजिया आणि विजयवाडा येथील पुण्यम राजू निवडून आल्याचे जाहीर केले आहे.
सचिवपदी मथुराचे कमलकांत उपमन्यु, जयपूरचे पंकज सोनी, चेन्नईचे काता कंदस्वामी आणि त्रिपुराचे प्रशांत चक्रवर्ती यांची निवड झाली आहे. श्री गुप्ता यांनी माहिती दिली की, महासभेच्या पहिल्याच दिवशी कार्यकारिणीतील ३१ सदस्यांसाठी निवडणुका घेण्यात येतील.
रास बिहारी यापूर्वी युनियनचे अध्यक्ष व सरचिटणीसही राहिले आहेत. प्रसन्ना मोहंती दुस-यांदा सरचिटणीस म्हणूनही निवडले गेले.
सर्व पदाधिका-यांच्या बिनविरोध निवडणुकीबद्दल एनयुजेचे अध्यक्ष प्रज्ञानंद चौधरी, सरचिटणीस शिवकुमार अग्रवाल आणि कोषाध्यक्ष सीमा किरण यांचे सर्व पदाधिका-यांचे अभिनंदन केले आहे. श्री चौधरी आणि अग्रवाल यांनी आशा व्यक्त केली आहे की नवीन पदाधिकारी पत्रकार जगतातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतील.
नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रचे मार्गदर्शक शिवेंद्रकुमार व अध्यक्ष शीतल करदेकर यांनी तसेच एनयुजे महाराष्ट्र च्या सर्व पदाधिका-यांनी एनयुजे इंडियाच्या नवनिर्वाचित पदाधिका-यांचे अभिनंदन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button