breaking-newsराष्ट्रिय

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा BSF वर हल्ला, चकमकीत चार जवान शहीद

लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर हल्ला केला आहे. छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यामधील कांकेर जिल्ह्यात हा हल्ला झाला. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह तीन कॉन्स्टेबल शहीद झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफ जवान महाला परिसरातील जंगलात गस्तीवर असताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर बीएसएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. कांकेरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक किरण राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘चार जवान शहीद झाले असून, दोन जखमी झाले आहेत. शहीद झालेल्यांमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कॉन्स्टेबलचा समावेश आहे’. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ANI

@ANI

: 4 BSF jawans have lost their lives in an encounter with Maoists in Kanker, Chhattisgarh

ANI

@ANI

Chhattisgarh: One BSF jawan has lost his life and two are injured in an encounter with Maoists in Kanker

View image on Twitter
254 people are talking about this

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला मोठा असल्याचं मानलं जात आहे. नक्षलवाद्यांनी या हल्ल्यातून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा संदेश दिला असल्याचं सांगितलं जात आहे. याआधी नक्षलवाद्यांनी बस्तर आणि कांकेर येथे बॅनर्स लावून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यास सांगितलं होतं.

नक्षलवादीग्रस्त भागातील मतदारसंघांमध्ये सुरळीत निवडणूक पार पडावी यासाठी निमलष्करी दलाला तैनात करण्यात आलं आहे. 11 एप्रिलला बस्तर आणि 18 एप्रिलला कांकेर मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button