breaking-newsराष्ट्रिय

छत्तीसगडच्या बस्तर विभागात 19 नक्षलींना अटक

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडमध्ये 19 नक्षलींना अटक करण्यात आली आहे. बस्तर विभागात वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून या नक्षलींना अटक करण्यात आली असून त्यापैकी दोघांवर एक एक लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आलेले आहे. 19 पैकी एका महिलेसह 16 जणांना नारायणपूर जिल्ह्यात अटक केली असून तीन जणांना विजापूर जिल्ह्यात अटक करण्यात आल्याची महिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. छत्तीसगड सशस्त्र दल आणि जिल्हा दल यांनी संयुक्‍तपणे मुस्नर, टोयामेटा, पुगरपाल आणि इर्पनार या गांवांत शोधमोहीम करून या सोळा नक्षलींना अटक केली. ही चारही गावे छोटेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत.

सुखराम उसेंडी (40) याच्यावर एक लाख रुपयांचे इनाम सरकारने जाहीर केलेले आहे. सुखराम हा माओवाद्यांच्या अदेरबेडा जनतन सरकार गटाचा म्होरक्‍या आहे. जनिला मांडवी (30) ही महिला टोयामेटा येथील दंडकारण्य आदिवासी किसान मजूर संघटनेची प्रमुख आहे. तिच्यावरही सरकारने एक लाख रुपयांचे इनाम जाहीर केलेले आहे असे अधिकाऱ्याने सांगितले. अन्य 14 जण हे बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेचे सदस्य आहेत.

दुसऱ्या एक कारवाईत सोमारू वेक्को, आशारम वेक्को आणि राजमन मांडवी या तीन नक्षलींना जिल्हा राखीव दलाने केशकुटूल सुरखाडा जंगलात अटक केली.

हे सर्वांवर लुटालूट, खुनाचा प्रयत्न, पोलीसांवर हल्ला करणे अशा गुन्ह्यांचे आरोप आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button