breaking-newsपिंपरी / चिंचवड

विवाहापूर्वी पत्नीसोबत प्रेमसंबंध असणा-या तरुणाचा सांगवीत खून

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

विवाहापूर्वी एका तरुणाचे पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा राग मनात धरून पतीने मित्राच्या सहायाने त्या तरुणाचा कोयत्याने खून केल्याची धक्कादायक घटना सांगवी येथे घडली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सौरभ व्यंकट जाधव (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ सुशांत व्यंकट जाधव (वय 24, रा. संजय नगर, स्पायसर कॉलेज शेजारी, औंध) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अयाज शेख (रा. शिवाजीनगर, पुणे) आणि सोन्या बाराथे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयाज शेख याच्या पत्नीने लग्नापूर्वी सौरभ जाधव याच्याशी प्रेमसंबंध होते. हे माहित झाल्यानंतर राग मनात धरून आयाजने सौरभचा काटा काढण्याचे कारस्तान रचले. सोन्याला मदतीला घेऊन आयाजने सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालय परिसरातील कँप आवारात काल रविवारी (दि. 13) रात्री साडेबाराच्या सुमारास सौरभला गाठले. त्याच्या उजव्या कानाच्या ठिकाणी धारदार कोयत्याने हल्ला केला. मानेवर आणि हातावर जबर वार केले. यात सौरभचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button