breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!

श्रीनगर: जम्मू-कश्मीरमधील बडगाव जिल्ह्यात आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एका जवान गंभीर जखमी झाल्याचे वृत्त होते. आता उपचारादरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आलेली आहे. नरेश उमराव बडोले असं त्या जवानाचं नाव आहे. आज दहशतवादी हल्ल्यात शत्रूशी लढताना नरेश बडोले यांना वीरमरण आलेलं आहे. दहशतवादी त्यांची सर्विस रायफल देखील आपल्यासोबत घेऊन गेलेले होते.

पोलिसांच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी बडगाम जिल्ह्यातील कॅसरमुल्लामध्ये CRPF च्या 117 व्या बटालीयनमधील एका जवानावर गोळी झाडलेली आहे. त्यांनी पुढे सांगितले की दहशतवादी त्यांची सर्विस रायफल (ए.के.रायफल) सोबत घेऊन गेले आहेत. जवानाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा भाग सील करण्यात आला असून दहशतवाद्यांचा तपास सुरू आहे. नरेश बडोले हे नागपूर येथे राहणारे असून त्यांचे लग्न झाले आहे. त्यांना वीरमरण आल्यानंतर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. महाराष्ट्रातील एका सुपूत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button