breaking-newsक्रिडा

चेन्नईनंतर आरसीबीला धक्का; स्टार गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

नवी दिल्ली – आयपीएलच्या तेराव्या सत्राला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच संघांना एकामागून एक धक्के बसत आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू सुरेश रैना याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यानंतर आता विराट कोहलीच्या आरसीबी संघालाही धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

आरसीबीच्या संघातील वेगवान गोलंदाज केन रिचर्ड्सनने आयपीएलला सोडचिठ्ठी दिली आहे. केन हा बाबा होणार असल्यामुळे तो यावर्षी आयपीएल खेळणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे केनऐवजी आरसीबी संघात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झम्पाला संधी दिली आहे.

२८ वर्षीय रिचर्ड्सन २०१६ साली आरसीबीसोबत जोडला होता. २०२० साली झालेल्या लिलावात आरसीबीने पुन्हा एकदा त्याच्या सोबत लिलाव केला होता. आरसीबीने रिचर्ड्सनला ४ कोटी रुपयांत खरेदी केले होते. तर झम्पा या लिलावात अनसोल्ड राहिला होता. त्याची बेस प्राईज १.५ कोटी होती. दरम्यान, झम्पाच्या समावेशामुळे आरसीबीचा फिरकी विभाग मजबूत झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button