breaking-newsराष्ट्रिय

उत्तर प्रदेशात दोन गटातील हिंसाचारात चौघे जखमी

भादोही (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशात दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये चौघे जण जखमी झाले आहेत. भादोही शहरातील कोतवाली भागामध्ये ही हिंसाचाराची घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले. दोन गटांमधील वादाला तीन दिवसांपूर्वीच सुरुवात झाली होती. अल्पसंख्यांक समाजाच्या काही मुलांनी दलित समाजाच्या विवाहस्थळामध्ये जबरदस्तीने प्रवेश केल्यामुळे हा वाद सुरू झाला होता. या विवाह मंडपामध्ये वाजवण्यात येत असलेल्या काही गाण्यांना आक्षेप घेण्यासाठी ही मुले तेथे गेली होती. त्यामुलांना मारहाण करून हाकलून लावण्यात आले होते.

ईदच्या दिवशी नमाज पठणानंतर या दोन्ही गटांमध्ये पुन्हा मारामारीला सुरुवात झाली. यावेळी दोन्ही बाजूंकडून दगडफेक झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी 18 जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिस अधिक्षक सचिंद्र पटेल यांनी सांगितले. दोन्ही समाजाच्या लोकांशी पोलिसांचा संपर्क असून परिसरामध्ये बंदोबस्त ठेवण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button