breaking-newsपिंपरी / चिंचवड

”चॅलेंजर पब्लिक स्कूल”च्या विद्यार्थ्याचा विश्वविक्रम, आमदार व महापौरांच्या हस्ते सन्मान

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

जगातील १९७ देशांची नावे अवघ्या ९४ सेकंदात बोलून दाखविण्याचा विक्रम पिंपळे सौदागर येथील ”चॅलेंजर पब्लिक स्कूल”च्या विद्यार्थ्याने केला. त्यामुळे विद्यार्थी प्रीत राजेश शिरोडकर आणि ”चॅलेंजर पब्लिक स्कूल”ची ”वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडीया” या पुस्तकात नोंद झाली आहे.

शाळेच्या या अलौकीक यशाची दखल पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील घेतली. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी विद्यार्थी प्रीत शिरोडकर याचे भरभरून कौतुक केले. यावेळी महापौरांनी त्याचा भव्य सत्कार देखील केला. चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दुसरीच्या वर्गात प्रीत शिकत आहे. त्याने सलग दुस-यांदा हा विश्वविक्रम केला आहे. त्याच्या यशाने पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकीकात मानाचा तुरा खोवला आहे. त्याबद्दल आज त्याचा महापौरांनी गौरव केला. यावेळी आमदार महेश लांडगे, संस्थेचे संस्थापक संदीप काटे, पक्षनेते एकनाथ पवार, प्राचार्या सुषमा उपाध्ये आदी उपस्थित होते.  

त्याचे वडिल डॉ. राजेश शिरोडकर हे भोसरीतील क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडीया येथे गेली २१ वर्ष कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करतात. ते पिंपळे सौदागर येथील रहिवासी असून ते ”चाईल्ड डेव्हलपमेंट कोच” व ”कॉर्पोरेट ट्रेनर” आहेत. त्यांनी ५४३ लोकसभा मतदार संघाची नावे अवघ्या ३.३० मिनीटात बोलून दाखविण्याचा विक्रम केला. त्यांचाही महापौरांनी सत्कार केला.

विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामान्य ज्ञान असणे काळाची गरज आहे. आपल्याकडील माहिती सादर करण्याची धाटणी असणे देखील तेवढेच गरजेचे आहे. ज्ञानाच्या जोरावर विद्यार्थ्याने शाळेचे नाव रोषण केले. त्यामुळे शहराच्या लौकीकत भर पडली. परंतु, आता इंग्रजी माध्यमाच्या सर्वच शाळांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सुसंस्कृतपणाची जोड देऊन सक्षम व सुज्ञ पुढी घडवली पाहिजे.

महापौर उषा उर्फ माई ढोरे, पिंपरी-चिंचवड महापालिका

शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना ”जनरल नॉलेज इन अडव्हान्स” प्राधान्याने शिकविले जाते. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर माहिती व तांत्रिक शिक्षणावर भर असल्यामुळे विद्यार्थ्यांची निपुणता लक्षात येते. त्यानुसार विद्यार्थ्यांमधील कलेला वाव देऊन त्याला शैक्षणिक दृष्ट्या सक्षम केले जाते. त्याच्यातील कला भविष्यातील यशाचा वेध कशी घेऊ शकेल, या दृष्टीने प्रयत्न केले जातात.

संदीप काटे, संस्थापक अध्यक्ष, चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागर
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button