breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चुकीची माहिती देणा-या डाॅक्टरला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिली नोटीस

मुंबई – करोना व्हायरसला गांभीर्याने घेऊ नका असं सांगत चुकीची माहिती पसरवणाऱ्या डॉक्टरला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) नोटीस पाठवली आहे. दादरमध्ये काम करणाऱ्या या डॉक्टरचं नाव अनिल पाटील असं आहे. डॉ. अनिल पाटील यांनी काही मुलाखतींमध्ये करोनाला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं सांगत चुकीची माहिती दिली होती. याची दखल घेत एमएमसीने नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितलं आहे.

या नोटीसवर एमएमसीचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले, ‘एमएमसी नोंदणीकृत डॉक्टर राज्य आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या शिफारशी आणि मार्गदर्शक सूचनांच्या विरोधात बोलू शकत नाही. आम्ही डॉ. पाटील यांच्याकडून स्पष्टीकरण पाठवलं आहे. त्यावर समाधान न झाल्यास एमएमसीच्या संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.’

करोना व्हायरस पसरण्यास सुरुवात झाल्यापासून एमएमसीने नोटीस पाठवण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. दरम्यान, आवश्यक ती पदवी नसतानाही पाटील स्वतःला आयुर्वेदिक डॉक्टर का म्हणून घेतात यावरही एमएमसीने स्पष्टीकरण मागवलं आहे. पाटील यांची नोंदणी एमएमसीकडे एमबीबीएस पदवीधारक म्हणून आहे. त्यामुळे यानुसारच व्यवसाय करायला हवा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button