breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागेल – कोटक महिंद्रा सीईओ

भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे रुळावर येण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागेल. यासाठी सरकारी मदतीची आवश्यकता भासेल. सरकारी प्रोत्साहनानेच हे उद्दिष्टय साध्य करता येईल असे मत कोटक महिंद्रा बँकेचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी व्यक्त केले. भारतीय औद्योगिक महासंघ अर्थात सीआयआयचे ते नवीन अध्यक्ष आहेत.

भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा वेग पकडेल असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या आठवडयात सीआयआयच्या कार्यक्रमात व्यक्त केला होता. त्यावर बोलताना उदय कोटक म्हणाले की, “करोनानंतर आपण पूर्णपणे नव्या काळामध्ये असू. अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आणि त्याचे मुल्यमापन सरासरीच्या आधारावर करणे योग्य ठरणार नाही. सीआयआयमध्ये आम्ही विकासासंबंधी अंदाज किंवा जीडीपी किती राहिल याबद्दल अंदाज वर्तवायचा नाही असे ठरवले आहे.” हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मते व्यक्त केली.

“करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. दोन महिने देशव्यापी लॉकडाउन होता. हळूहळू आता काही गोष्टी सुरु होत आहेत. अजूनही देशातील काही भाग बंद राहणार आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, निश्चित त्याचा मागणीवर परिणाम होईल. सहजतेने अर्थव्यवस्था रुळावर येईल असे होणार नाही. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याआधी अर्थव्यवस्था जिथे होती. त्या टप्प्यावर पुन्हा येण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागेल” असे उदय कोटक म्हणाले.

मोदी सरकारने जाहीर केलेले २०.९७ लाख कोटीच्या पॅकेजवर त्यांनी समाधान व्यक्त केले. “अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याची सुरुवात करण्यासाठी सरकारने चांगले पॅकेज दिले आहे. एमएसएमई म्हणजे छोटया, लघु, मध्यम उद्योगाला वित्तीय सहाय्य देण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी कौतुक केले”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button