कोरिया प्रजासत्ताकच्या फर्स्ट लेडी किम जंग सुक यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरिया प्रजासत्ताकच्या फस्ट लेडी किम जंग सुक यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून त्या भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाच्या त्या प्रमुख पाहुण्या राहणार असून दि.8 नोव्हेंबर रोजी अयोध्या येथे राणी सुरीरत्न (हिओ व्हॉंग-ओक) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. अयोध्या आणि कोरिया यांचे ऐतिहासिक, सखोल संबंध आहेत.
अयोध्येच्या राणी सुरीरत्न यांनी कोरियाला ख्रिस्त इरा 48 मध्ये भेट देऊन कुरियन राजा सुरो यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या. पंतप्रधानांनी आजच्या बैठकीत फस्ट लेडी किम यांच्याशी भारत-कोरिया अध्यात्मिक, नागरी विषयांवर सखोल चर्चा केली आणि लोकांमध्ये परस्पर संवाद वाढावा यासाठी विचारांची देवाणघेवाण केली. किम यांनी सेऊल शांतता पुरस्काराने पंतप्रधानांना गौरवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यावर हा सन्मान खरे तर भारतीयांचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. जुलै 2018 मध्ये दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए यांनी भारताला यशस्वी भेट दिली होती. त्या भेटीच्यावेळे भारत- कोरियाने विशेष धोरणात्मक भागीदारीला उजाळा दिला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.