breaking-newsराष्ट्रिय

अयोध्या-बाबरी मशीद खटला लांबणीवर

घटनापीठापुढील मंगळवारची सुनावणी रद्द

राजकीयदृष्टय़ा संवेदनशील रामजन्मभूमी- बाबरी मशीद खटल्याची २९ जानेवारीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने रविवारी रद्द केली. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठातील एक न्यायाधीश सुनावणीला उपस्थित राहणार नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

मंगळवारची सुनावणी रद्द करण्यात आली असली तरी न्यायालयाने नवी तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. न्या. शरद बोबडे २९ जानेवारीला उपस्थित राहणार नसल्यामुळे, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ २९ जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी घेणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने म्हटले आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यतेखालील या घटनापीठात शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण, एस. नझीर या न्यायाधीशांचा समावेश आहे.

मूळ घटनापीठाचे सदस्य असलेले न्या. उदय लळित यांनी माघार घेतल्यामुळे पाच सदस्यांचे नवे खंडपीठ २५ जानेवारीला स्थापन करण्यात आले होते. यात न्या. एन. व्ही. रामण यांना वगळण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button