breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

चिंताजनक! सुशांतच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून ही मोठी माहिती गायब; वकिलांनी केला सवाल

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वकील विकास सिंह सातत्याने रिया चक्रवर्ती आणि महाराष्ट्र पोलिसांवर प्रश्न उपस्थित करीत आहेत. आता विकास सिंह यांनी सुशांतच्या पोस्टमार्टेम रिपोर्टवर सवाल उपस्थित केला आहे. एका वृत्तसंस्थेशी बातचीत करताना सुशांतच्या वडिलांना विकासला सांगितले, सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूच्या वेळेचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये. त्याला मारल्यानंतर फाशी देण्यात आलेली होती की त्याचा मृत्यू फाशीमुळे झाला होता? त्यांनी सांगितले की या सर्व गोष्टी मृत्यूची वेळ माहिती असल्यावरचं स्पष्ट होऊ शकणार आहे.

यापूर्वी सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी सांगितले की, माझ्या तक्रारीत हे स्पष्ट करण्यात आलेले आहे की मुंबई पोलिसांनी या प्रकरणात गोंधळ केला आहे. ते योग्य पद्धतीने तपास करीत नाहीत. मला बिहारमध्ये FIR दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझी मुलगी अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर होती जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला आणि सुशांतची बॉडी खाली उतरवली आहे. त्यांनी दरवाजा उघडण्यापूर्वी टाळं तोडणाऱ्याला कोठून पाठवलं होतं. या सर्व गोष्टी संशयास्पद नाहीत का? पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूची वेळ देण्यात आलेली नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button