breaking-newsक्रिडा

धोनीसोबतच सुरेश रैनाचीही निवृत्तीची घोषणा

मुंबई – भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने स्वातंत्र्य दिनी सायंकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केल्याने जगभरातील क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला. मात्र चाहते या धक्क्यातून सावरत नाहीत तर काही क्षणातच भारताचा अनुभवी क्रिकेटपटू सुरेश रैना यानेही आपल्या निवृत्तीची घोषणा केली. धोनी आणि रैना यांनी एकाच दिवशी, एकाच वेळी निवृत्ती जाहीर केल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सुरेश रैनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून ‘या प्रवासात मीसुद्धा तुझ्यासोबत आहे’, असे म्हणत आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

सुरेश रैना याने आपल्या कारकिर्दीत 18 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 768 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने वन डे आणि टी 20 सामन्यांमध्येही चांगलीच चमक दाखवली होती. रैनाने 226 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 5 हजार 615 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतके आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. रैनाने 78 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 1 हजार 604 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर रैनाने 193 आयपीएल सामने खेळले असून या सामन्यांमध्ये त्याने एकूण 5 हजार 368 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे.

आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना हे दोघेही एकाच संघात खेळतात. महेंद्रसिंह धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्स या संघात दोघेही खेळतात. सुरेश रैना यंदाही आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना पहायला मिळणार आहे. यंदाचा आयपीएल सीजन हा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत खेळवला जाणार आहे. या आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ २१ ऑगस्ट रोजी यूएईसाठी रवाना होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button