breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

महाराष्ट्रात 10वी, 12 वीच्या फेर परीक्षा कोरोनाची परिस्थिती पाहून ठरवल्या जाणार- शिक्षण मंडळ

मुंबई: कोरोना व्हायरस आरोग्य संकटाचा मोठा फटका यंदा शिक्षण क्षेत्राला बसलेला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून महाराष्ट्रात अद्याप शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलेला नाहीय. पण त्यामुळे यंदा राज्यात 10वी, 12 वीच्या फेर परीक्षा देखील अधांतरी आहे. त्याचं ठोस वेळापत्रक शिक्षण मंडळाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र मीडीया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्रात यंदा 10 वी आणि 12वीच्या फेर परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2020 च्या सुमारास होऊ शकतात.

मागील महिन्यात या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्याचा मानस व्यक्त करण्यात आला होता मात्र आता त्या अजून पुढे ढकलल्या जाऊ शकतात. वृत्तानुसार, महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संसर्गाची परिस्थिती पाहून फेरपरीक्षा घेण्यात येईल असे सांगितलेले आहे. कोरोनाच्या सावटाखाली परीक्षा घेण्यात अनेक अडचणी सध्या शिक्षण मंडळासमोर आहेत. प्रशासनाने अनेक शाळा विलगीकरण कक्षासाठी घेतलेल्या आहेत. सोशल डिस्टंसिंग राखत परीक्षा घेण्यासाठी परीक्षा कक्ष वाढवावे लागतील, त्यासाठी मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात वाढवावे लागणार आहे. मात्र, त्यासाठी शाळा पुन्हा उपलब्ध करून घ्याव्या लागणार आहेत, परिणामी परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षा घेण्यात येईल असे शिक्षण मंडळाने सांगितलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button