breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमधून लक्ष्मण जगताप हॅट्रिक साधणार?

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना 8960 मतांनी आघाडीवर आहेत. जगताप यांना 41,372 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी राहुल कलाटे यांना 32412 मते मिळाली आहेत.

लक्ष्मण जगताप चिंचवड विधानसभा मतदारसंघात सलग दहा वर्षे आमदार आहेत. या वेळी त्यांची हॅटट्रिक होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. – 2009 : विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत 2008 मध्ये चिंचवड मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत लक्ष्मण जगताप आमदार झाले. त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. शेतकरी कामगार पक्षाचा त्यांना पाठिंबा होता. शिवसेनेचे श्रीरंग बारणे व कॉंग्रेसचे भाऊसाहेब भोईर प्रतिस्पर्धी होते.

2014 : जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व विजयी झाले. त्यांनी एक लाख 23 हजार
786 मते मिळवली होती. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे राहुल कलाटे होते. तिसऱ्या स्थानावर
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विठ्ठल काटे होते. 2019 : भाजप-शिवसेनेची महायुती आहे.

भाजपचे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत जगताप यांनी ही निवडणूक लढविली. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर व गेल्या वेळचे प्रतिस्पर्धी कलाटे आहेत. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुरस्कृत केले आहे. 2009 चे प्रतिस्पर्धी बारणे शिवसेनेचे खासदार असून त्यांची जगतापांना साथ आहे. भोईर मात्र, राष्ट्रवादीत आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button