breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना पदाधिकाऱ्याचा प्रेयसीच्या घरी गळफास, चंद्रकांत खैरेंची महिला पोलीस निरीक्षकाशी खडाजंगी

औरंगाबाद – शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. औरंगाबादमध्ये शिवसेना उपतालुका प्रमुख सुनील खजिनदार जोरदार राडा पाहायला मिळाला. यावेळी चंद्रकांत खैरेंचा आवाज चढला, त्यावर राजश्री आडे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

शिवसेना उपतालुका प्रमुख सुनील खजिनदार यांनी प्रेयसीच्या घरात आत्महत्या केली होती. आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर हजारोंचा जमाव पोलीस ठाण्यात जमला होता. यावेळी चंद्रकांत खैरे यांनीही पोलीस निरीक्षकांवर ओरडण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनीही खैरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. चंद्रकांत खैरे आणि राजश्री आडे यांच्या खडाजंगीचा व्हिडीओ समोर आला आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे औरंगाबाद उपतालुका प्रमुख आणि दौलताबाद ग्रामपंचायत सदस्य सुनील खजिनदार यांनी प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी समोर आली होती. मात्र खजिनदार यांच्या कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सुनील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयातून त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणला.

सुनील खजिनदार यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यासाठी शेकडोंच्या जमावाने दौलताबाद पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. या घटनेमुळे दौलताबादेत तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावातील दुकाने, बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button