breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमधील मोरया शिक्षण संस्थेस नोटीस

  • इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा अनधिकृतपणे सुरु

पिंपरी ( महा ई न्यूज ) – चिंचवड येथील मोरया शिक्षण संस्थेमार्फत शासनाची कोणतीही मान्यता न घेता इंग्रजी माध्यमाची अनधिकृतपणे शाळा सुरु आहे. याबाबत यशवंत कर्डिले यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार सादर केली आहे. त्यावरुन शिक्षण प्रशासन अधिका-यांनी शाळेला नोटीस बजावून तीन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत, अशी माहिती ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली.

चिंचवड येथील मोरया शिक्षण संस्थेमार्फत एम.एस.एम. इंग्लिश मिडीयम शाळा शासनाची कोणतीही मान्यता आणि पुर्वपरवानगी न घेता अनधिकृत सुरु केली आहे. गेल्या नऊ वर्षापासून ही शाळा सुरु आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा अनधिकृतपणे सुरु असल्याची तक्रार यशवंत कर्डिले यांनी केली आहे.

यावरुन महापालिका शिक्षण विभागाने मोरया शिक्षण संस्थेस नोटीस बजाविली आहे. श्रीधरनगरमधील अनधिकृत सुरु असलेली मोरया शिक्षण संस्थेबाबत आपणकडील शासन मान्यतेची योग्य ती कागदपत्रे तीन दिवसात शिक्षण विभागाकडे सादर करावीत, अन्यथा महापालिका शिक्षण विभागाकडून ही शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर करण्यात येईल, असा इशारा प्रशासन अधिकारी शिंदे यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button