breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘सूरतमध्ये माझा गेम करण्याचे आदेश होते’; ठाकरे गटातील आमदाराचा फडणवीसांवर गंभीर आरोप

मुंबई | ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरूवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर मॉरिसने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

आमदार नितीन देशमुख म्हणाले की, राज्यातील सत्तासंघर्षावेळी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलो होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी माझा गेम करण्याचा प्लॅन रचला होता, असा धक्कादायक आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला. शिंदे गटातील एका आमदारानेच मला ही माहिती दिली. त्याने सांगितले की, तुम्ही ज्यावेळी सुरतमध्ये होता, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: तुम्हाला ठार मारण्याचे षडयंत्र रचले होते.

हेही वाचा     –      ‘बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळायला हवा’; राज ठाकरेंची मागणी 

शिंदे गटासोबत सत्तास्थापन करण्याच्या प्लॅनमध्ये मी अडथळा ठरत असल्याने फडणवीस यांना माझा गेम करायचा होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सुरतमध्ये असताना मला हृदयविकाराचा झटका आल्याची खोटी बातमी प्रसारमाध्यमांना दिली, असा दावाही नितीन देशमुख यांनी केला. देवेंद्र फडणवीसांनी या गोष्टी करताना विचार करायला पाहिजे. वेळ आल्यावर आम्ही अशा लोकांचा हिशेब चुकता करु. आम्ही मरणाला न घाबरणाची माणसे आहोत, असेही देशमुख यांनी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button