breaking-newsराष्ट्रिय

चालकाच्या मृतदेहाचे तुकडे करुन अॅसिडमध्ये टाकले; डॉक्टरचे अघोरी कृत्य, कारण…

मध्य प्रदेशमधील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरने त्याच्याकडे काम करणाऱ्या चालकाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टरचे चालकाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते आणि त्याचा अडथळा दूर करण्यासाठी ही हत्या करण्यात आली. डॉक्टरने चालकाच्या मृतदेहाचे तुकडे करुन अॅसिडने भरलेल्या ड्रममध्ये ते तुकडे टाकले होते. यामुळे पुरावे नष्ट होतील, असा डॉक्टरचा अंदाज होता.

होशंगाबादमधील आनंद नगर येथे राहणारा डॉ. आनंद मंत्री (वय ५८) हा सरकारी रुग्णालयात कार्यरत आहे. आनंद मंत्रीकडे विरेंद्र उर्फ विरू पाचौरी (वय ३०) हा चालक म्हणून कामाला लागला होता. मंत्रीच्या पत्नीचे एप्रिल २०१७ मध्ये निधन झाले होते. तर त्याचा २६ वर्षांचा मुलगा आणि २३ वर्षांची मुलगी ही मुंबईत कामाला आहे. २०१० पासून मंत्री हा त्याच्या पत्नीसह आनंद नगर येथील दुमजली घरात राहत होता.

मंत्रीची पत्नी आणि वीरुची पत्नी या दोघी मिळून ब्यूटी पार्लर चालवत होत्या. पत्नीच्या निधनानंतर मंत्री यांनी वीरुच्या पत्नीला ब्यूटी पार्लर चालवायला दिले. वीरुची पत्नी आणि मंत्री यांच्यात अनैतिक संबंध होते. याची कुणकुण वीरुला लागली होती.

अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने मंत्रीने वीरुचा काटा काढायचे ठरवले. ‘ब्रेकींग बॅड’ या इंग्रजी शोचा आधार घेत मंत्रीने वीरुच्या हत्येचा कट रचला. सोमवारी मंत्री वीरुला घेऊन इटारसीतील रुग्णालयात गेला. तिथून परतल्यावर वीरुने दातदुखीची तक्रार केली. यानंतर डॉ. मंत्रीने वीरुला इंजेक्शन दिले. या इंजेक्शनमुळे वीरुची हालचाल मंदावली. यानंतर मंत्रीने निर्घृणपणे वीरुची हत्या केली. त्याने वीरुच्या मृतदेहाचे तुकडे केले. यानंतर ते तुकडे घरातील एका ड्रममध्ये टाकले. त्या ड्रममध्ये मंत्रीने आधीपासूनच अॅसिड टाकून ठेवलेले. अॅसिडमध्ये तुकडे टाकल्याने सर्व पुरावे नष्ट होतील, असा त्याचा अंदाज होता.

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Madhya Pradesh: Dr Sunil Mantri arrested for allegedly killing his servant&later chopping his body into pieces, in Hoshangabad. According to police, the doctor committed crime after the servant objected to doctor’s close relationship with his (servant’s) wife. (05.02.2019)

३६ लोक याविषयी बोलत आहेत

शेजारी राहणाऱ्या कुटुंबाला डॉ. मंत्री यांच्या घरातील हालचाली संशयास्पद वाटल्या. सोमवारी रात्री ते मंगळवारी सकाळी या कालावधीत मंत्रीचे वावरणे संशयास्पद वाटल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराची झाडाझडती घेतली असता हा प्रकार उघड झाला.  वीरुने मंत्री यांच्याकडे खंडणी मागितली असावी किंवा त्याने पत्नीपासून लांब राहण्याची धमकी दिली असावी, असा प्राथमिक संशय आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button