breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

शिवसेनेच्या बंडाबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट; म्हणाले,.साहेबांनी आधीच सांगितले होते

आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास टाकला तिथेच खरी गफलत झाली

मुंबई : शिवसेनेचे आमदार फुटणार ही महिती उद्धव ठाकरेंना दोन, तीन वेळा दिली होती. तरी या सगळ्या गोष्टी घडू दिल्या गेल्या, आमदारांना खुशाल जाऊ दिलं गेलं, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे.

आमदार फुटणार ही माहिती शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दोन, तीन वेळा दिली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी फोन करून, मीटिंग केली होती. मी स्वत: उद्धवजींना सावध केलं होतं, पण ते बोलले की तो आमचा पक्षांतर्गंत मामला आहे, माझ्या आमदरावर माझा विश्वास आहे. पक्षनेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास टाकला तिथेच खरी गफलत झाली, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे.

या सगळ्या गोष्टी घडू दिल्या गेल्या, आमदारांना खुशाल जाऊ दिलं गेलं, तिकडे हे व्हायला नको होतं. मी देखील स्वत: उद्धवजींना सावध केलं होतं पण ते बोलले की मी बोलेन एकनाथ शिंदे यांच्याशी तो आमचा पक्षांतर्गत मामला आहे, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी मला दिलं, असंही अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button