breaking-newsराष्ट्रिय

रामायणातला ‘राम’ काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढणार ?

रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रामायण’ मालिकेत प्रभूरामचंद्रांची भूमिका साकारणारे अरुण गोविल लवकरच आपल्याला राजकारणाच्या मैदानात दिसू शकतात. ते काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या विरोधात इंदूरमधून अरुण गोविल यांना उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा विचार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कार्यालयातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

काँग्रेसच्या बैठकीमध्ये इंदूरच्या जागेसाठी अरुण गोविल यांच्या नावाचा विचार झाला. मध्य प्रदेशात १५ वर्षानंतर सत्ता मिळवणाऱ्या काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीत २० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. इंदूर हा भाजपाचा बालेकिल्ला असून सुमित्रा महाजन सलग आठवेळा या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.

भोपाळ आणि इंदूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांनी नेहमीच भाजपाला साथ दिली असून मागच्या तीस वर्षात काँग्रेसला इथे एकदाही लोकसभेची निवडणूक जिंकता आलेली नाही. ९० च्या दशकातील ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत अरुण गोविल यांनी प्रभूरामचंद्रांची भूमिका साकारली होती. इंदूरमध्ये त्यांना उमेदवारी दिली तर ते गेमचेंजर ठरतील असे काँग्रेसच्या एका गटाला वाटते.

अरुण गोविल यांच्या नावाचा विचार झाला असून त्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला तर त्यावर गांभीर्याने विचार होईल असे प्रदेश काँग्रेसचे मीडिया सेलचे समन्वयक नरेंद्र सलुजा यांनी सांगितले. भोपाळमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी आधी करीना कपूर त्यानंतर प्रियंका गांधी यांच्या नावाचा आग्रह धरला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button