breaking-newsपुणे

चारशे मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात!

  • वाहतूक पोलिसांकडून कारवाई

पुणे – नववर्षांच्या पाश्र्वभूमीवर मद्यपी वाहन चालकांकडून होणाऱ्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. गेल्या चार दिवसात वाहतूक पोलिसांकडून ३९३ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

मद्य पिऊन वाहन चालविण्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. नाताळ आणि नववर्षांच्या दरम्यान शहरात गंभीर स्वरुपाचे अपघात घडण्याचे प्रमाण विचारात घेऊन पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मद्यपी वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. या पाश्र्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्याचा वेग वाढविला आहे. वाहतूक शाखेच्या २२ विभागांकडे मद्यपी वाहन चालकांची तपासणी करण्यासाठी ब्रीथ अ‍ॅनलायजर यंत्रं आहेत. महापालिकेने वाहतूक शाखेला आणखी १०० ब्रीथ अ‍ॅनलायजर यंत्रं नुकतेच उपलब्ध करुन दिली आहेत. गेल्या चार दिवसांत वाहतूक पोलिसांकडून ३९३ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक शाखेचे (नियोजन) वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.

नववर्षांच्या पाश्र्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून वारजे, कोरेगाव पार्क, शिवाजीनगर वाहतूक विभागांना अतिरिक्त ब्रीथ अ‍ॅनलायजर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पुढील चार दिवसात मद्यपी वाहन  चालकांवर करण्यात येणाऱ्या कारवाईचा वेग वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button