breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

एनडीएतील कॅडेट मृत्यूप्रकरणाच्या चौकशीचे लष्करी न्यायालयाचे आदेश

पुणे – पुण्यातील एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षणादरम्यान एका कॅडेटचा मृत्यू झाला. हा कॅडेट मालदीव येथील असून एनडीएत शनिवारी ‘जोश रन’ स्पर्धेदरम्यान ही घटना घडली होती. मूळचा मालदीवचा कॅडेट मोहम्मद सुलतान अहमद (२१) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश लष्करी न्यायालयाने दिले आहेत.

एनडीएत नेहमीप्रमाणे प्रशिक्षणाचा भाग असलेली १२ किमी धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती. यात मोहम्मद सहभागी झाला होता. धावताना त्याला चक्कर आल्यासारखे वाटले आणि तो कोसळला. त्याला तातडीने एनडीएच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर आणि लष्कराने दिली.माेहम्मद हा १२ मार्चला एनडीएच्या १४५ व्या तुकडीत दाखल झाला होता. तो एनडीएच्या १४५ व्या अभ्यासक्रमासाठी आला होता.सध्या त्याचा अभ्यासक्रमाचा दुसरा टप्पा सुरू होता.इब्राहिमचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे नेमके कारण शोधण्यासाठी लष्करी न्यायालयाच्या आदेशानुसार एनडीए प्रशासनातर्फे चाैकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच मालदिव वकिलातीलाही याची माहिती देण्यात आली आहे. त्याच्यावर मालदीव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहितीही एनडीए प्रशासनाने दिली. दरम्यान, याप्रकरणी उत्तम नगर पोलीस ठाण्यात कलम १७४ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button