गायिका प्राची धरमसी यांचे कर्करोगाने निधन
वाद्यवृंद क्षेत्रातील गायिका आणि हौशी रंगकर्मी प्राची बिरेन धरमसी यांचे कर्करोगाने मुंबई येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्या 44 वर्षांच्या होत्या.
प्राची यांनी मित्रांसमवेत “एहसास’ या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेमार्फत विविध संकल्पनांवर आधारित गीतांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यामध्ये त्या आघाडीवर होत्या. गोड गळ्याची गायिका, अशी ओळख असलेल्या प्राची यांना विविध गीतांसाठी रसिकांकडून फर्माईश होत असे. प्राची या बॅंक ऑफ बडोदा येथे नोकरीला होत्या. आंतरबॅंक नाट्यस्पर्धेत त्यांनी बॅंकेमार्फत विविध नाटकांमधून भूमिका केल्या होत्या. प्राची यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. विवेक परांजपे, गफार मोमीन, प्रशांत नासेरी, मधुरा दातार, विभावरी आपटे, सुवर्णा माटेगावकर, दत्ता थिटे यावेळी उपस्थित होते.