breaking-newsपिंपरी / चिंचवड

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पिंपळे साैदागरमध्ये ‘पे अँड ड्राईव्ह’ स्कूटर सुविधा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपळे सौदागर येथील नागरिकांसाठी महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ‘पे अँड ड्राईव्ह’ स्कूटर सुविधा आठ ते दहा दिवसामध्ये सुरु होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी दिली.

नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे आज लिप कंपनीचे स्कूटरचे नागरिकांनी राईड घेतली. लिप कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना माहिती दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या स्कूटरचा जास्तीत जास्त वापर करावा. प्रदूषणमुक्त पिंपळे सौदागर पेडल सायकलप्रमाणे आता नागरिकांसाठी स्मार्ट सिटी अंतर्गत पे अँड ड्राईव्ह तत्वावर ई- स्कूटर सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका व लिप कंपनी यांच्या सहयोगाने कि लेस इलेक्ट्रोनिक स्कूटर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या स्कूटरचे वैशिष्ट्य..
ही स्कुटर इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे एकदा चार्ज केल्यावर ६० किलोमीटर पर्यंत जावू शकते. या इलेक्ट्रॉनिक स्कुटर (ई-स्कुटर) Android App द्वारे चालु किंवा बंद करता येते. तसेच ई-स्कुटरला चार्जिंगसाठी ४ ते ५ तास लागतात, टॉप स्पीड २५ किलोमिटर प्रति तास आहे. प्रथमच पिंपळे सौदागर नागरिकसाठी ई-स्कुटर ही सेवा सुरू करण्यात येत आहे. नागरिकांना हि स्कूटर चालवण्यासाठी पहिले १५ मिनीटांची राईड फ्री असणार आहे. त्यानंतर प्रत्येक मिनिटासाठी १.५० रुपये आकारला जाणार आहे. कोणत्याही UPI अँप्सद्वारे पैसे पेड करून ई-स्कुटरचा वापर नागरिकांना करता येणार आहे.

या स्कूटरचे चार्गिंग पॉइंट गणेशम सोसायटीमधील बीआरटीच्या पार्किंगमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुरुवातीला कुणाल आयकॉन रोड वरील विविध ठिकाणी २० स्कूटर ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून येथील नागरिकांना छोट्या कामासाठी चार चाकी घेवून जाण्यापेक्षा ई-स्कूटरचा वापर करता येईल.यामुळे रस्त्यावरील होणारी कोंडी काही प्रमाणात टाळता येईल तसेच प्रदूषण कमी होण्यास मदत होईल अशी माहिती नाना काटे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button