breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

चक्कर येणं किंवा अचानक डोकं गरगरु लागणे हा कोणताही गंभीर आजार नाही

चक्कर येणं किंवा अचानक डोकं गरगरु लागणं हा कोणताही गंभीर आजार नाही. तर हे एक शारीरिक कमजोरी असण्याचं लक्षण आहे. कधी कधीच चक्कर येणं एखाद्या आजाराचा संकेत देखील असू शकतं. जसं की एनीमिया, बीपी कमी होणं, हृदय कमजोर होणे, ब्रेन ट्यूमर किंवा अतिप्रमाणात ताण तणाव असणं. खरं तर आपण उन्हातून घरी आलो की आपलं डोकं जड होतं आणि आपल्याला चक्कर येऊ लागते. चक्कर आल्याने उत्साह राहत नाही, विचित्र आणि असहाय्य वाटू लागतं, काम करण्याची इच्छा होत नाही, धड झोपही लागत नाही आणि एनर्जी अचानक कमी झाल्यासारखी वाटू लागते.

खरं तर चक्कर येणं हा गंभीर आजार जरी नसला तरी त्रासदायक समस्या आहे हे मात्र नक्की! अशा वेळी आपल्याला समजत नाही की नक्की कशामुळे आपल्याला असं होतंय? आणि या समस्येवर आराम मिळवण्यासाठी काय उपाय करावेत? कारण आराम हा जरी यावर पर्याय असला तरी हे औषध नक्कीच नाही. म्हणूनच मंडळी, तुम्हालाही कधी अचानक अशी चक्कर आली किंवा घराबाहेरुन आल्यावर असं होत असेल तर ताबडतोब घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीपासून तुम्ही हा त्रास दूर करू शकता जाणून घ्या कसा?

साधारणत: चक्कर येण्याची समस्या भेडसावताना व्यक्तीला जीव घाबरा घुबरा होणं, मळमळ होणं, शिट्टी वाजत असल्यासारखा आवाज कानात सतत घुमत राहणं अशा काही समस्या जाणवू लागतात. या दरम्यान काही लोकांना ऐकू येण्याचं बंद होतं किंवा कान जड झाल्यासारखे वाटू लागतात.
चक्कर येण्याच्या या समस्येला बिनाइनपैरॉक्सिस्मल पोजिशनल वर्टिगो असं म्हटलं जातं. ज्याला शॉट मध्ये BPPV असंही म्हटलं जातं. ही समस्या वयस्कर लोकांमध्ये आणि जास्त वय असणा-या लोकांमध्ये अधिक दिसून येतेय.

वेळेनुसार बरी होणारी समस्या

बहुतांश वेळा कमजोरी कमी होताच चक्कर येण्याची समस्या देखील दूर होते. पण जर तुम्हाला चक्कर कोणत्या औषधांचा साईड इफेक्ट, मेंदूशी निगडीत काही समस्या किंवा अन्य कोणत्या रोगामुळे येत असेल तर याचे निदान हे केवळ वैद्यकिय उपचारांनीच होऊ शकते.

आपल्या मसाल्यांतील एक उपयुक्त पदार्थ म्हणजे धणे .जीव घाबरा घुबरा होण्याची समस्या दूर करण्यास, चक्कर कमी करण्यास आणि मळमळ दूर करण्यासाठी फार जुना उपाय आहे. हा शारीरिक कमजोरी दूर करण्यासोबतच चक्कर येण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे. यासाठी रात्री झोपताना एक चमचा धणे आणि सुका आवळा पाण्यामध्ये भिजत घाला. सकाळी हे पाणी गाळून त्याचं सेवन करा. शक्य असल्यास धणे आणि आवळा गुळासोबत चावून खा. यामुळे तुमचं पोट साफ राहिल आणि शरीर नैसर्गिकरित्या मजबूत राहिल. आवळा आणि धणे ब-याच आजारांना शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करतात.

आल्याचा चहा

चक्कर आल्यास किंवा डोकं गरगरु लागल्यास आल्याचा छोटासा तुकडा तोंडात ठेऊन चॉकलेटसारखा हळू हळू चघळू शकता. जर तुम्हाला कच्चं आलं खाण्यास काही त्रास होत असेल तर तुम्ही नियमित आल्याचा चहा पिऊ शकता.
आलं आपल्या शरीरातील रक्तप्रवाह वाढवण्याचं काम करतं. सोबतच आलं तुमचा मेंदू शांत ठेऊन त्यास संतुलित ठेवण्यास लाभदायक ठरतं. तसंच जीव घाबरा-घुबरा होणं व मळमळ किंवा उलटी होण्याच्या समस्येपासून सुटका देतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button