breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोहोळमध्ये गर्भलिंग चाचणी ‘रॅकेट’ उघडकीस, डॉ. मस्केसह तिघांवर गुन्हा दाखल

गर्भलिंग चाचणी करण्यास बंदी असतानाही बेकायदा अशा प्रकारे चाचण्या करणाऱ्या मोहोळ येथील विहान हॉस्पिटलचे डॉ. सत्यजित मस्के यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. मुलाच्या हव्यासापोटी समाजामध्ये होत असलेला स्त्री-भ्रूण हत्येचा अमानवीय प्रकार रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणीवर कायदेशीररित्या बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी कडक कायदाही करण्यात आला आहे. मात्र, तरीही अधिक पैसे कमावण्यासाठी बेकायदा गर्भलिंग चाचण्या करणाऱ्या डॉ. सत्यजित मस्के यांच्यावर पोलिसांनी कारवाईचा बगडा उगारला आहे.

मोहोळ पोलिसांच्या माहितीनुसार, मोहोळ येथे माया अष्टूळ नावाची महिला गर्भलिंग निदान चाचणी करीत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेद अंदुरकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी विधी अधिकारी ॲडव्होकेट राजेश्वरी माने यांच्यासह वैद्यकीय विभागातील एक पथक तयार करीत या पथकामार्फत एका डमी गर्भवती महिलेला या प्रकाराचा भांडाफोड करण्यासाठी सहभागी करून घेतले. या माहिलेमार्फत त्यांनी माया अष्टूळ बरोबर संपर्क साधला. दरम्यान, मायाने संबंधीत गर्भवती महिलेला चाचणीसाठी सुरुवातीला सोलापूर, पंढरपूर त्यानंतर मोहोळ येथे बोलावण्यात आले. त्यानंतर येथील विहान हॉस्पिटल येथे ते दाखल झाले.

नेहमीच ठरलेले हॉस्पिटल असल्याने संबंधित गर्भवती महिलेला तात्काळ गर्भलिंग निदान विभागात नेण्यात आले. यावेळी मायाने संबंधीत गर्भवती महिलेला या चाचणीसाठी १४ हजार रुपये लागतील असे सांगितले. त्यानुसार, ठरलेल्या रकमेपैकी आठ हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून म्हणून तिला देण्यात आले. यांपैकी सहा हजार रुपये डॉ. मस्के यांना देण्यात आले. तर दोन हजार रुपये मायाने स्वतःजवळ ठेवले. उर्वरित रक्कम रिपोर्टच्यावेळी देण्याचे ठरले. दरम्यान, डॉ. म्हस्के यांनी संबंधित गर्भवती महिलेची लिंग चाचणीचा रोपोर्ट सांगितला. त्याचवेळी बाहेर दबा धरून बसलेल्या वैद्यकीय पथकाने धाड टाकली, कारवाई झाल्याचे लक्षात येताच डॉ. म्हस्केसह मायाने आपल्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग चाचणी झाली नसल्याचा कांगावा करीत आरडाओरडा करीत आत्महत्येचा इशारा देत वैद्यकीय पथकाच्या कारवाईत अडथळा आणला.

त्यानुसार, शासकीय कामात अडथळा करीत तसेच बेकायदा गर्भलिंग चाचणी केल्याप्रकरणी मोहोळ ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. पी. पी. गायकवाड यांनी मोहोळ पोलिसांत डॉ. सत्यजित मस्केसह माया अष्टूळ आणि ठरलेला रिक्षाचालक आप्पा आदलिंगे यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर या तिघांनाही मोहोळ येथील कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अन्वर मुजावर करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button